30.8 C
Latur
Saturday, May 25, 2024
Homeक्रीडाराहुल, क्विंटन चेन्नईवर भारी

राहुल, क्विंटन चेन्नईवर भारी

लखनौ : चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल सामन्यात ८ बळी राखून लखनौ सुपरजायंट्सने विजय मिळवला आहे. कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सने चेन्नई सुपरजायंट्सचा ८ गडी राखून पराभव केला.

चेन्नई सुपर किंग्सने १७६ धावा ठोकल्या होत्या. चेन्नईच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. दुस-याच षटकात रचिन रवींद्र शून्यावर बाद झाला. ऋतुराज गायकवाड १७ धावा करून बाद झाला तर शिवम दुबे ३ धावा करून बाद झाला. अजिंक्य रहाणेने ३६ धावांचे योगदान दिले. समीर रिझवी केवळ एक धाव काढून बाद झाला. मोईन अलीने ३० धावांची झटपट खेळी केली. रवींद्र जडेजाने ४० चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी खेळली. एमएस धोनीने ९ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार मारत २८ धावांची खेळी खेळली. लखनौला विजयासाठी १७७ धावांची गरज होती. लखनौच्या राहुल आणि क्विंटन डी कॉक या जोडीने जोरदार फटकेबाजी करीत शानदार विजय मिळविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR