32.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये कांदा बाजार ठप्प

नाशिकमध्ये कांदा बाजार ठप्प

खरेदी-विक्री नाही, ७०० कोटींची उलाढाल थांबली
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कांदा बाजार गेल्या २० दिवसांपासून बंद आहेत. विविध सण-उत्सव, मार्च एंड तसेच हमाल मापाडी यांच्या प्रश्­नांमुळे बाजारातील उलाढालीला ब्रेक लागला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत कांदा असूनही शेतक-यांना तो विकता येत नाही. कांदा विक्रीसाठी ने-आण करणा-या ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहनांनाही रोजगार नाही.

बाजार बंद असल्याने उन्हाळी कांदा काढणीचे कामही रेंगाळले आहे. या प्रक्रियेतील शेतमजूर बेरोजगार झाले आहेत. एकूणच जिल्ह्यातील १५ बाजार समित्या, त्यांच्या उपबाजारातून होणारी कांदा खरेदी-विक्री व यातून निर्माण होणारा रोजगार पाहता जवळपास ७०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत व उमराणे या बाजार समित्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक उलाढाल होते. रोज सरासरी १५ ते २० हजारकिं्वंटल कांदा विक्रीसाठी येतो. उर्वरित बाजार समित्या व त्यांच्या उपबाजारात रोज सरासरी ७ ते १० हजार क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री होते.

२९ मार्चला गुडफ्रायडे, ३० व ३१ मार्चला शनिवार, रविवार नियमित सुटी, १ ते ४ एप्रिल या कालावधीत व्यापा-यांच्या मार्चएंडच्या हिशोबामुळे लिलाव बंद होते. ५ एप्रिलपासून हमाल, मापाडी व व्यापारी यांच्यातील प्रश्­नांमुळे लिलाव बंद आहेत. या प्रश्­नावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. बाजार बंद असल्याने अनेक शेतक-यांनी कांदा चाळीत राखून ठेवला आहे.

रोज दीड लाखापेक्षा
अधिक कांदा बाजारात
साधारणत: जिल्ह्यात दिवसाकाठी दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक कांदा विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येतो. २० दिवसात ३० ते ३५ लाखकिं्वंटल कांद्याची खरेदी-विक्री थांबली. चांगल्या वातावरणामुळे उन्हाळी कांद्याचे पीक जोमात आहे. सध्या कांद्याला १५०० ते २ हजारादरम्यान भाव मिळाला असता. परंतु बाजारच सुरू नसल्याने व्यवहार ठप्प आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR