33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्र‘रुको रुको बाहर मत निकलो’; गोळीबाराचे आवाज

‘रुको रुको बाहर मत निकलो’; गोळीबाराचे आवाज

बुलडाण्याच्या कुटुंबाला पहलगामच्या हॉटेलमालकाने वाचवले

बुलडाणा : जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास २५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. सुदैवाने बुलडाणा जिल्ह्यातील पाच जणांचा जीव या दुर्घटनेतून बचावला आहे. अचानक फायरिंग सुरू झाल्याने हॉटेलमालकाने त्यांना बाहेर जाण्यापासून थांबवले आणि संपूर्ण कुटुंब बचावले.

निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ. श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी बचावलेल्या कुटुंबीयांची नावं आहेत. १८ तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला निघाले होते. जम्मू- काश्मीरमधील सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर २१ तारखेला रात्री पहलगाममध्ये हॉटेलला आले.

२२ ला सकाळी पहलगाममध्ये फिरायला निघणार, तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. जेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलडाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते. फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता.
दुसरीकडे, गोव्यात मडगाव येथे राहणा-या दर्शिता देसाई आणि त्यांचे कुटुंबीय सहलीसाठी काश्मीरला रविवारी पोहोचले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR