रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, लाभार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. प्रशासनाचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. १५) तहसील कार्यालयासमोर ‘जागरण गोंधळ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रलंबित मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली.
पिकांचे तातडीने पंचनामे करून रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच दुष्काळी निकषानुसार शेतक-यांना सवलती लागू कराव्यात, पावसाने पाठ फिरवल्याने माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची कार्यवाही करावी पात्र शेतक-यांना पीकविमा रकमेचे तातडीने वाटप करावे, शेतक-यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, तर शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची विशेष मदत जाहीर करावी, रेशीम शेतीचे प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करून नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, तसेच नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून एक लाख रुपये करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष तथा संचालक प्रमोद बाळासाहेब कापसे, जिल्हा उपाध्यक्ष गंगसिह कदम, शहरध्यक्ष नितीन मोटेगावकर, रेणाचे संचालक धनराज देशमुख, बाजार समिती संचालक प्रकाश सूर्यवंशी, अॅड. शिरीष यादव, अॅड.मुरलीधर पडोळे, सचिन इगे, केशव माने, बिभीषन कदम, सचिन मोटेगावकर, भूषण पनुरे, गजेंद्र चव्हाण, पद्मसिंह पाटील, अमरिश भिसे, प्रदिप काळे, उमाकांत खरगे, शेषेराव हाके, सुरेंद्र शिंदे, प्रदीप राठोड, पंडीत माने, विलास भोसले, तानाजी कांबळे, चंद्रकांत पवार, पृथ्वी राज देशमुख, दत्ता डिगोळे, हणमंत पवार, बाळासाहेब पवार, लिबराज साखरे, गोविंद वीर, कल्याण शाहीर, नरेंद्र शिंदे, अनिल पाटील, बाळकृष्ण माने, अमोल माने, बालाजी हाके, बालासाहेब अहीरवाड, सुरज वंगाटे हरिभाऊ जाधव, बालाजी गोटके, उध्दव जाधव, तात्याराव वाघमारे, विवेक चव्हाण, अभिजित चव्हाण, विनोद खंदाडे, विश्वनाथ कागले, मंचक राऊतराव उरगुंडे दिलीप, भिमाशंकर कोरे, आशादुल्ला सय्यद, उमेश शिंदे, प्रदिप चव्हाण, विश्वजीत पाटील, शुभम पडूळकर, दत्ता बारसकर, ज्ञानोबा कोल्हे, विलास राठोड, मदने रघुनाथ, भंडारे हनुमंत, अजयकुमार चक्रे, सुग्रीव जाधव, संदीपान देशमुख, पंडित माने, शेख पाशामिया, किरण भदभदे, बाळासाहेब गरड, हणमंत पवार, प्रदीप कापसे, गणेश कलाल, आनंत पाटील, राम शिंदे, बाळासाहेब फुंदे, गोविंद पवार, हरिभाऊ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर तसेच विविध मागण्यांसाठी त्रस्त असलेले नागरिक उपस्थित होते.
















