22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूररेणापूर तालुका हा काँग्रेसच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभा

रेणापूर तालुका हा काँग्रेसच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभा

रेणापूर : प्रतिनिधी
मतदारसंघ पुनर्रचना होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघात आलेला रेणापूर तालुका हा काँग्रेस पक्षाच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभा आहे. जिल्हा परिषद, साखर कारखाने, जिल्हा बँक यामुळे लातूर बरोबर रेणापूर तालुक्याचाही विकास झाला. त्यामुळे या तालुक्याने काँग्रेसच्या विचारांना नेहमी बळ देण्याचे काम केले, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार  धिरज विलासराव देशमुख यांनी केले. विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या रूपाने मला भरभरून आशीर्वाद मिळाला. तसाच आशीर्वाद डॉ. शिवाजी काळगे यांना द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधील रेणापूर शहरातील नेहरुनगर, हाकेतांडा, राजेवाडी, रुपचंदनगर, रेणुकानगर, ओमनगर, रामनगर, संभाजीनगर, काळेवाडी, हणमंतवाडी, हणमंतवाडी तांडा आदीसह विविध प्रभागांमध्ये संवाद बैठका घेवून आमदार धिरज देशमुख आणि काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकरी, महिला, तरुणांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून डॉ. शिवाजी काळगे यांना बहुमताने विजयी करु, असा संकल्प केला.
केवळ महिलाच नव्हे शेतकरी, मजूर, तरुण, विद्यार्थी, उद्योजक, वाहनचालक असे अनेक घटक सरकारच्या जाचक धोरणांमुळे नाराज आहेत. एकमेकांत भांडणे लावण्याचे, पक्ष फोडाफोडीचे कामही सरकारने केले आहे. हे जनतेला आवडलेले नाही. या सगळ्याचे पडसाद या निवडणुकीत उमटतील याची खात्री आहे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले. ही निवडणुकीत सत्यासाठी आहे. आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावून मला विजयी करावे, असे आवाहन डॉ. शिवाजी काळगे यांनी केले.
याप्रसंगी किरण जाधव, प्रमोद जाधव, अनुप शेळके, संजय शेटे, पृथ्वीराज शिरसाठ, अनंतराव देशमुख, संभाजी रेड्डी, उमाकांत खलंग्रे, सचिन दाताळ, स्वाती सोमाणी, शेषराव हाके, इम्रान सय्यद, रमेश सूर्यवंशी, हणमंत पवार, उमेश सोमाणी, पूजा इगे, रुपेश चक्रे, सतीश बिराजदार, हरिभाऊ साबदे, गोंिवद पाटील, पंकुडे, अशोक राठोड, भूषण पनुरे, पाशा शेख, पद्म पाटील, अजय चक्रे, प्रवीण माने, प्रमोद कापसे, विश्वनाथ कागले, गणेश कलाल, बाळासाहेब करमुडे, प्रदीप काळे, गुलाब चव्हाण, तुकाराम कोल्हे, सूर्यकांत मोटेगावकर, रहीम पठाण, दासू राठोड, आव्हाड ताई, बाळासाहेब पाटील, राजकुमार पाटील, पप्पू सिरसकर, ंिलबराज राठोड, प्रदीप राठोड, विठ्ठल राठोड, सतीश चव्हाण, प्रेमचंद पवार, निशांत वाघमारे, नानासाहेब काळे, विजय काळे, रामदास जाधव, गणेश आकनगिरे, कृष्णा जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR