रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील दिलीप नगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ मधील उत्पादीत केलेल्या २,२१,१११ व्या (५० किलो) पोत्याचे पुजन शुक्रवारी दि २२ डिसेंबर रोजी रेणा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा . चेअरमन अनंतराव देशमुख,रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषेराव हाके, सचिन दाताळ, संचालक सर्वश्री, लालासाहेब चव्हाण, संजय हरिदास, संग्राम माटेकर, धनराज देशमुख, प्रेमनाथ आकणगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रविण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके,अनिल कुटवाड तानाजी कांबळे, सौ वैशालीताई माने, सौ अमृताताई देशमुख, सतीश पाटील, स्रेहलराव देशमुख, पंडितराव माने, कार्यकारी संचालक बी. व्ही.मोरे व खाते प्रमुख यांची उपस्थिती होती.
रेणा सहकारी साखर कारखान्याने लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख , लातूर ग्रामीणचे आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी मोठ्या परिश्रमाने पिकवलेल्या ऊसाचे गाळप तत्परतेने करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील असून कारखान्याने अवघ्या ४८ दिवसांत दि. २१ डिसेंबर रोजी पर्यंत १, ७७, ९७० मे. टन. गाळप करीत ९.४२ टक्केप्रमाणे साखर उता-यासह १, ५७, ८००किं्वटल साखरेचे उत्पादन केले आहे. चालू गळीत हंगामात रेणा साखर कारखान्याचे दैनंदिन गाळप उत्तमरित्या सुरू आहे.