36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeलातूररोजगार मेळाव्याच्या नावाखाली कंत्राटी भरती!

रोजगार मेळाव्याच्या नावाखाली कंत्राटी भरती!

लातूर : प्रतिनिधी 
सत्ताधारी महायुती सरकारने लातूर येथे दि. २४ व २५ फेब्रुवारीदरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळावा घेतला. नव मतदारांना आकर्षीत करण्यासाठी केलेला हा प्रयत्न केवळ ‘इव्हेंट’ ठरला. कंपन्या आल्या, मुलाखतींचे सोपस्कार झाले आणि कंपन्यांनी जॉबचे लॉलीपॉप दाखवून गाशा गुंडाळला. रोजगार महामेळाव्याच्या नावाखाली कंत्राटी भरती करण्याच्या या प्रयत्नामुळे बेरोजगारांची अपेक्षा भंग झाली. कंत्राटीच भरती करायची होती तर इतका सारा पसारा मांडून नमो महारोजगार मेळावा घेण्याची गरजच काय होती?, अशी जळजळीत प्रतिक्रिया गेली दोन दिवस रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या बेरोजगारांनी व्यक्त केली.
लातूर येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी ऑन लाईन आणि ऑफ  लाईन अर्ज भरुन घेण्यात आले. महाराष्ट्रातील नामांकीत कंपन्यांच्या एचआर डिपार्टमेंटने दुस-या दिवशी सकाळी बेरोजगार युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती म्हणजे केवळ नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक विचारला गेला. रोजगाराच्या अपेक्षेने मुलाखतीस सामोरे गेलेल्या बेरोजगारांना मात्र कंपनी मुख्य कार्यालयाकडून तुम्हाला कळविले जाईल. तेथे या अंतिम मुलाखत घेतली जाईल आणि तुम्हाला जॉब द्यायचा की नाही, हा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आल्याने बेरोजगारांची अपेक्षा भंग झाली. हजारो बेरोजगार रोजगार न मिळाल्याने हताश झाले. कंपनीतच अंतिम मुलाखत घेऊन जॉब दिला जाणार होता तर गेली दोन दिवस नमो महारोजगार मेळावा घेतला कशासाठी?, थेट कंपनीच हे करुन शकली असती. एवढा डामडौल करण्याची गरज होती काय?, असा थेट सवाल बेरोजगार युवक-युवती करीत होते.
सहा युवक चक्कर येऊन पडले
या मेळाव्यात लातूरसह इतर जिल्ह्यातील युवक ग्रामीण भागातून सकाळी लातूर येथे आले होते. सध्या तापमानाचा पारा ३३ अंश सेल्सीयशच्यावर पोहचला आहे. तसेच उभारण्यात आलेल्या स्टॉलच्या ठिकाणी युवकांची गर्दी असल्याने व उन्हाचा वाढता पा-यामुळे सहा युवक रोगार मेळयाव्याच्या ठिकाणी चक्कर येऊन पडले. त्यांच्यावर उपस्थित वैद्यकीय टिमने उपारार्थ ओआरएस पिण्यासाठी दिले. वाढत्या उन्हामुळे चक्कर आली आसावी, युवकांनी रोजगाराच्या बरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. तसेच जर कांही सिरीयस असेल तर अतिक्षतेसाठी व उपचारासाठी अ‍ॅब्युलस उपलब्ध असल्याचे डॉक्टरच्या टिमने सांगीतले. तसेच त्यांच्याकडे डोके दुखी, तापीच्या गोळया, वाढते उन्ह व धुळीच्या कणामुळे मळमळ होणे, पित्ताच्या गोळया उपलब्ध असल्याचे डॉक्टरच्या टिमने सांगीतले.
जागेवर जॉबकार्ड मिळणे अपेक्षीत होते, पण इव्हेंट सगळा
लातूर शहरातील नामवंत इंजिअरिंग महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने मुलाखत दिली. त्याच्याशी चर्चा केली असता तो म्हणाला, मोठ्या अपेक्षेने आलो होतो. मुलाखतीत कागदपत्र पाहिली. नांदेड येथील कंपनीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे दाखल करा, तुम्हाला बोलावले जाईल तेव्हा धाराशिवला जाऊन अंतिम मुलाखत द्या, असे सांगण्यात आले. लातूर येथून नांदेडला जा, बोलावले तर धाराशिवला जा, तेथे मुलाखत दिल्यानंतर जॉब मिळणार की नाही, हेही निश्चित नाही. खरे तर मेळाव्यात जागेवर जॉबकार्ड मिळणे अपेक्षीत होते तसे झाले नाही. मेळावा म्हणजे सरकारी इव्हेंट आहे., असे तो म्हणाला. सदर विद्यार्थ्याला अडचण  येऊ नये म्हणून त्याचे नाव छापण्याचे टाळले आहे.
रोजगारापेक्षा विद्यार्थ्यांची दिशाभूल   
या मेळाव्यात पुणे, धाराशिव, सभांजीनगर, लातूर येथील नामांकित कंपनीचा सर्वेकेला असता या नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘एकमत’शी बोलताना सागीतले की या मेळाव्यात आपल्या कंपनीचे स्टॉल उभा करुन फक्त्त विद्यार्थींचे फॉर्म गोळा करुन ठेवण्यास सागीतले आहे. खाजगी कंपनीत फक्त कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याचे काही कंपन्याच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.  या मेळाव्यातून जे विद्यार्थी काही खाजगी कंपनीत काम करण्यासाठी पात्र असतील त्या सर्व विद्यार्थीना किमान वेतन कायद्यानूसार पगार न करता खाजगी कंत्राटी पद्धतीने पगार देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR