24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’च्या रकमेत वाढ करणार

‘लाडकी बहीण’च्या रकमेत वाढ करणार

अजित पवारांचे मोठे आश्वासन; राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाची घोषणा ‘लाडकी बहीण’ विषयी करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणा-या रकमेत वाढ करण्यात येईल असे म्हटले गेले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले गेले आहे.

जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केले ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणा-या योजना मागच्या ४ महिन्यांत केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत.

स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांचे काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाईनला २५ लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत.
९८ ६१ ७१ ७१७१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही २१०० रुपये करणार आहोत. २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
लाडकी बहीण योजने संदर्भात बहिणींना दीड हजार नाही तर तब्बल २१०० रुपये देण्यात येणार

* सोबत महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

* यात धान उत्पादक शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे

* तर ग्रामीण भागात ४५००० पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा

* शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचा वादा करण्यात आला आहे

* वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे

* वृद्ध पेन्शनधारकांना आता पंधराशे वरून महिन्याला २१०० रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

* दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा

* २५ लाख रोजगारनिर्मितीचा वादा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR