मुंबई : विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्य कलांमध्ये महायुती तब्बल २१० जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजप तब्बल १२५ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे महिलांच्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी महायुतीच्या पारड्यात गेल्याचे चित्र आहे. महिलांचे यंदा तब्बल ६५ टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल सहा टक्के अधिक होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २ कोटी ४८ लाख ५२ हजार महिलांनी मतदान झाले. मात्र यंदाच्या निवडणुकीत तब्बल ३ कोटी ६ लाख ४९ हजार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत तब्बल ५७ लाख ९६ हजार अधिक महिलांनी मतदान केले होते.
भाजपचा रेकॉर्डब्रेक विजयाकडे
महायुती तब्बल २१५ जागांवर आघाडीवर असताना भाजप १२५ जागांवर सुरवातीला आघाडीवर दिसत आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ५५तर,अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ३५जागांवर आघाडीवर आहे.
.
हा जनतेचा कौल नाही: राऊत
सुरवातीच्या कलामध्ये महायुती मोठ्या आघाडीकडे वाटचाल करत असताना संजय राऊत यांनी हा हा जनतेचा कौल नाही, हा अदानी आणि पैशांचा कौल , यात काही तरी गडबड आहे, असा आरोप केला. लाडक्या बहिणींचा फायदा महायुतीला झाला तर मग लाडके आजोबा, लाडके भाऊ यांचे काय झाले असा सवाल देखील राऊत यांनी केला