लातूर : प्रतिनिधी
माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हेनगर कॉर्नर ते श्रीकृष्णनगर चौक सिमेंट रस्ता तयार केला जाणार आहे. यासह श्रीकृष्णनगर चौक ते हनुमान मंदिर सिमेंट रस्ता आणि राहुल नगर, बादाडेनगर, बस्तापुरेनगर येथे रस्ता व नाली बांधकाम केले जाणार आहे. गणेश मंदिर शेजारी सिमेंट रस्ता, कोल्हेनगर भागात तसेच मंठाळे नगर भागात रस्त्याचे काम होणार आहे. कोल्हेनगर, श्रीकृणनगर या भागात नाली बांधकाम व गौसपुरा भागातील रस्त्याचे कामही या निधीतून केले जाणार असल्याची माहिती गोजमगुंडे यांनी यावेळी बोलताना दिली.
याप्रसंगी माजी नगरसेविका पूजाताई पंचाक्षरी, डॉ. फरजाना बागवान, सुभाषअप्पा पंचाक्षरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद, माजी नगरसेवक सोमनाथ झुंजारे, काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष राम गोरड, यशपाल कांबळे, ख्वॉजामियाँ शेख, जयकुमार ढगे, इब्राहिम शेख बोरीकर, हमीद बागवान यांच्यासह, आकाश गायकवाड , धनराज कांबळे, डी. उमाकांत, चव्हाणताई, चेतन कोले, राम सूर्यवंशी, बालाजीराव माने, विशाल चामे, गजभार सर, आकाश गायकवाड, धनराज कांबळे, अमजद शेख, पडीले, मुस्तकीम पटेल, केदार, बालाजी केदार, अब्दुल्ला शेख, मनपा अधिकारी अकबर शेख, फिस्के, आशिष साठे, रवी शेंडगे, महादेव धावारे, रहीम शेख आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.