23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूरलातूरमध्ये जोरदार पाऊस

लातूरमध्ये जोरदार पाऊस

लातूर : प्रतिनिधी
लातूरमध्ये सोमवारी दिवसभर कडक ऊन आणि उकाडा प्रचंड होता. त्यानंतर सायंकाळी आकाशात ढग दाटून आले. परंतु रिमझिम पाऊस झाला. परंतु रात्री १० नंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. लातूरमध्ये रोज पाऊस हजेरी लावत आहे. परंतु आतापर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. परंतु सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर सखल भागात पाणी साठले. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. परंतु पावसाचा जोर म्हणावा तसा नव्हता. परंतु त्यानंतर साडेनऊच्या सुमारास आकाश पुन्हा झाकोळून आले आणि विजांचा कडकडाटही सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. दहाच्या सुमारास प्रथम साधारण पाऊस झाला. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही वेळांतच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. लातूर परिसरातच पावसाचा अधिक जोर होता. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे गाव भागांत नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच सखल भागातही पाणीच पाणी झाले आहे.

लातूर शहर परिसरात रोज साधारण पाऊस पडत होता. मात्र, जिल्ह्यातील ब-याच भागांत पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पेरणी झाली असून, पिकांची उगवणही चांगली झाली आहे. परंतु मोठा पाऊस पडत नसल्याने पिकांची म्हणावी तशी वाढ होत नव्हती. परंतु सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात ब-याच भागात या पावसाने हजेरी लावली. विशेषत: लातूर तालुका, रेणापूर, औसा तालुक्यातील काही भागाला जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR