27.4 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeलातूरलातूर जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी डॉ. वाघमारे

लातूर जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी डॉ. वाघमारे

रेणापूर  : प्रतिनिधी
लातूर जिल्हा कॉग्रेस सरचिटणीसपदी  डॉ तात्याराव सखाराम वाघमारे  यांची निवड करण्यात  आली असून बुधवारी  दि. १६ रोजी माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आ. धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे  महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे यांनी माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. कॉग्रेस पक्षाने त्याचा सन्मान करीत पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणे आणि विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी दिली. कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी रेणापूर तालुक्यातील ईटी येथील डॉ तात्याराव वाघमारे यांची  जिल्हा कॉग्रेसच्या  सरचिटणीसपदी  निवड करून माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीण आ. धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते  नियुक्ती पत्र देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रेणापूर तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमर यशवंतराव पाटील, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, सभापती उमाकांत खलंग्रे, सुशिलकुमार पाटील , रमेश सूर्यवंशी, प्रभाकर केंद्रे, विश्वासराव देशमुख, बाळासाहेब करमुडे  यांच्यासह कॉग्रेसचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR