लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या आदर्शाचे पालन करत वाटचाल करणा-या जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कापसे, कार्याध्यक्षपदी डॉ. ब्रिजमोहन त्र्यंबकदास झंवर यांची तर तर कार्यवाहपदी राम मेकले यांची शनिवारी पार पडलेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. शनिवारी संघाचे मावळते अध्यक्ष हावगीराव बेरकीळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रंथालय संघाच्या पदाधिका-यांसमवेत निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. संतोष गिल्डा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी प्रभाकर कापसे यांची, कार्याध्यक्षपदी डॉ. ब्रिजमोहन झंवर यांची तर कार्यवाहपदी राम मेकले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी युवराज जाधव, कोषाध्यक्षपदी राम मोतीपवळे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षीय समारोप हावगीराव बेरकीळे यांनी केला. प्रास्ताविक कार्यवाह राम मेकले यांनी केले. यावेळी डॉ ब्रिजमोहन झंवर, अॅड. संतोष गिल्डा, संघाचे नूतन कोषाध्यक्ष राम मोतीपवळे, संजय सूर्यवंशी, बिराजदार गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन जहांगीर सय्यद यांनी तर आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी केले. जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध पार पडलेल्या निवडणुकीत डॉ. ब्रिजमोहन झंवर, हावगीराव बेरकीळे, युवराज जाधव, प्रभाकर कापसे, किरण बाभळसुरे,राम मेकले ,राम मोतीपवळे, बाळकृष्ण होळीकर, बालाजी सूर्यवंशी, सूर्यकांत शिरसे, तिपण्णा साहू, अनिल पाटील, जहांगीर सय्यद, गुप्तलिंग स्वामी, काशिनाथ बोडके, अशोक खोडवे, श्रीधर स्वामी, नंदकुमार घोगरे, गोकर्णा जाधव – सूर्यवंशी, तुकाराम सुगावकर, संतोष करमले हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.