23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeलातूरलातूर जिल्हा बँकेच्या वाटचालीत विविध कार्यकारी संस्थांचे मोठे योगदान

लातूर जिल्हा बँकेच्या वाटचालीत विविध कार्यकारी संस्थांचे मोठे योगदान

लातूर : प्रतिनिधी
देशभरात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव केला जातो. यामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांचे योगदान लाख मोलाचे असल्याचे गौरोद्गार माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी काढले. दि महाराष्ट्र बँक्स असोसिएशनद्वारा दिला जाणारा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट बँक पुरस्कार व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांना पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल औसा तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थांचे चेअरमन यांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी जिल्हा बँक संचालिका  स्वयंप्रभा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नारायण लोखंडे, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, सदाशिव कदम, बाबासाहेब गायकवाड, पृथ्वीराज सिरसाठ, रघुनाथ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर जिल्हा बँक ही आपल्या जिल्ह्यातील शेतक-यांचा मोठा आधार असून शेतकरी आहे म्हणून देश आहे त्यामुळे शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेऊन ते यशस्वीपणे राबवले. यामुळे आपल्या भागातील शेतक-यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडले आहे, असे त्यांनी सांगितले या वेळी सर्व विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन व सदस्यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विविध कार्यकारी संस्था चेअरमन दत्तकुमार शिंदे, वाघंबर कांबळे, गोरख सावंत, दिनकर मेढकर, गुणवंत कदम, धनराज साळुंखे, दिलीप पाटील, अशोक जंगाले, गुणवंत करडे, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR