HomeUncategorizedलातूर जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी?

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी?

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात उष्माघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून औसा तालुक्यातील एरंडी गावात तीव्र उन्हामुळे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. महेश लिंबाजी इंगोले असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. महेश लिंबाजी इंगोले शेतातील काम आटोपून घरी परतल्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उष्माघातामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा उष्माघाताचा तिसरा बळी ठरला आहे. या अगोदर औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे शेतक-याचा आणि गोंद्री (ता. औसा) येथे चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR