21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरलातूर तालुका काँग्रेसची संवाद बैठक

लातूर तालुका काँग्रेसची संवाद बैठक

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुका काँग्रेसच्या वतीने लातूर तालुक्यातील मौजे ममदापूर येथे भातांगळी सर्कलमधील धनगर समाजाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक लातूर मधील धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजीराव सूळ यांच्या अध्यक्षतेखाली दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोविंदराव सुरवसे यांचे निवासस्थानी झाली.
या बैठकीस प्रा. सिद्राम कटारे, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, तत्कालीन लातूर नगरपालिकेचे  माजी शिक्षण सभापती गोविंदराव सुरवसे, लातूर तालुका काँग्रेसचे ओबीसी विभाग अध्यक्ष  ज्ञानोबा गवळे, लातूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश सुरवसे हे उपस्थित होते. धनगर समाजाची विद्यमान आर्थिक, सामाजिक स्थीती, एस. टी. आरक्षणाबाबत विद्यमान भाजप सरकारची दुटप्पी भूमिका, काँग्रेस पक्षाने घेतलेली सकारात्मक भूमिका, जात निहाय जनगणना व धनगर, मराठा आरक्षणाबाबत ५० टक्क्यांची मर्यादा वाढवुण न्याय देणेची भुमिका.,  लोकनेते विलासराव देशमुख यांनी केलेले लोकाभिमुख विकासात्मक राजकारण, शिक्षण, सहकार, एमआयडीसीचे औद्योगीकरण यातून साधलेला लातूरचा विकास, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव  देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात लातूरसाठी खेचून आनलेला निधी,  मतदारसंघातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचा केलेला प्रयत्न,  कोविड काळातील काम, शेतक-यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये शेतक-यांना दिलेले अनुदान, या व अशा अनेक कामाच्या माध्यमातून लातूरला व लातूरकरांना दिलासा देण्याचे काम माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांनी केल्याचे संभाजीराव सूळ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, प्रा. सिद्राम कटारे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
आभार बालाजी सुरवसे यांनी मानले. बैठकीस उपस्थित बामणीचे माजी सरपंच वैजनाथ दिवटे, महादेव दिवटे, भातांगळीचे बालाजी सुरवसे, शिवाजीराव म्हेत्रे बोरी, बळवंत खिरेकर बोकणगाव, लक्ष्मण शिंदे बोकणगाव, दत्तात्रय बोंबलगे, दत्तात्रय सुरवसे, बापूसाहेब शेळके, बाळु सुरवसे, प्रभाकर चोपडे, व्यंकुराम बेडदे, बालाजी कोरे, दगडु माने, बालाजी आवले, सुरेश भंगे इत्यादीं व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR