28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरलातूर, नांदेड जिल्ह्यांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचानामे करावेत

लातूर, नांदेड जिल्ह्यांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचानामे करावेत

लातूर : प्रतिनिधी
लातूर व नांदेड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, ढगफुटी व पुरपस्थितीमुळे शेतक-यांसह नागरिकांचे खुप मोठे नूकसान झाले आहे. या नूकसानीचे तत्काळ पंचानामे करुन तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार लोकार्पण व महिला मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. ४ सप्टेंबर रोजी उदगीरला आले होते. त्याप्रसंगी खासदार डॉ. काळगे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन दिले. लातूर व नांदेड जिल्ह्यात  शेतीचे, पशुधनाचे व जमीनीचे प्रचंड नूकसान झाले आहे. काही ठिकाणी पुरामुळे शेतक-यांचा मृत्यू झाला आहे.   लातूर व नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांना तातडीची मदत द्यावी, पिकविमा लागु करुन सर्व शेतक-यांचे पीक कर्ज माफ करावे, नव्यापे पीक कर्ज वाटप करावे, सरसकट पंचनामे करुन सानुग्रह अनुदान द्यावे, असेही खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी निवेदनात नमुद केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR