21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरलातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत ऑटोमोबील इंडस्ट्री, क्लस्टर विकसित करावे

लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत ऑटोमोबील इंडस्ट्री, क्लस्टर विकसित करावे

लातूर : प्रतिनिधी
लातूर ते टेभुर्णी या संपूर्ण रस्तयाचे एकत्रित चौपदरीकरण करावे, येडशी ते टेभुर्णी दरम्यानच्या कामालाही मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन दयावा, पु. अहिल्याबाई होळकर चौक ते जीवाजी महाले चौक हा रस्ता मिसीक लींक म्हणून चौपदरीकरणाने जोडावा, त्याच बरोबर साखर आणि इथेनॉलचे दर वाढविण्यासाठी केंद्राकडे पाठपूरावा करावा, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात ऑटोमोबील इंडस्ट्रि कल्स्टर तसेच ई-मोबीलीटी सेंक्टर झोन निर्माण करावेत आदी मागण्याचे निवेदन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १६ जानेवारी  रोजी दिल्लीत भेट घेऊन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवारी केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लातूरसह मराठवाड्यातील विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली. महामार्गाचे प्रलंबीत विषय मार्गी लावण्याचीही विनंती केली. साखर तसेच ऑटोमोबील इंडस्ट्रि संदर्भाने यावेळी चर्चा केली. लातूर-टेभुर्णी महामार्गावरील मुरुडअकोला-येडशी दरम्यानच्या कामासाठी ५४७ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल आमदार देशमुख यांनी नामदार गडकरी यांचे यावेळी विशेष आभार मानले. येडशी ते टेभुर्णी दरम्यानच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची व संपूर्ण महामार्गाचे एकत्रित काम पूर्ण करावे, लातूर शहरातील पु. अहिल्याबाई होळकर चौक ते जिवाजी महाले (चौक गरुड) चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ३६१ आणि राष्ट्रीय महामार्ग ५४८ ई  या दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणा-या  रस्त्याचे मिसिंग लिंक म्हणून चौपदरीकरण करावे.  लातूर ते जहीराबाद (७५२ ङ) या राष्ट्रीय महामार्गाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत, साईड पट्ट्या खचल्या आहेत, नाल्याचे काम व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून ते काम दुरुस्त करून घ्यावे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची सुपर लिंक म्हणून शिरुर ताजबंद ते उदगीर या रस्त्याचे बांधकाम करावे. पुणे – सोलापूर – हैदराबाद (एन. एच-६५ या महामार्गावरील वाहतूक आता खूप वाढली आहे परिणामी प्रवासाचा वेळ अधिक झालाय, अपघातही होत आहेत. त्यामुळे या महामार्गाचे रुंदनीकरण नव्याने करायला हवं ही बाबसुद्धा चर्चेमध्ये आणली आणि या संदर्भामध्ये नव्याने सर्वेक्षण करण्यासंदर्भामध्ये मंत्री गडकरी यांनी सूचना दिले. विशेषत: उमरगा फाटा येथील कामे कासवगतीने सुरु आहे.  त्यांच्यामुळे प्रवाशांचे हाल होतात त्या संदर्भामध्येसुद्धा त्यांनी कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याआहेत, हा जो महामार्ग आहे. याची रुंदी आणखी वाढेल आणि भविष्यामध्ये तो आठ पदरी दहा पदरी होईल अशी अपेक्षा आहे.
साखर व इथेनॉल दर वाढीसाठी केंद्राकडे पाठपूरावा करावा साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु असुन या हंगामात साखरेचे उत्पादन घटत असून कारखान्याना आर्थिकदृष्टया परवडत नाही. या अनुषंगाने महाराष्ट्रातील आणि देशातील  साखर उद्योगासंदर्भानेही यावेळी चर्चा झाली. साखरेच्या हमीदराच्या संदर्भामध्ये  मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या स्तरावर या संदर्भाने चर्चा सुरू आहेत त्यास आणखीन गती देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
इथेनॉलच्या दराच्या दरामध्येही अशाच पद्धतीने वाढ करण्याच्या संदर्भाने मागणी त्यांच्याकडे नोंदवली,  साखर आणि इथेनॉल याचे हमीदर वाढले तर एकंदरीतच साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळेल आणि देशांमध्ये आणि राज्यातील साखर कारखान्याकडे असलेली थकबाकी कमी होईल. शिवाय शेतक-यांना वाढीव एफआरपी देता येईल ही बाब चर्चेदरम्यान अधोरेखित केली. मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये ऑटोमोबिल इंडस्ट्री क्लस्टर विकसित करावी अशी विनंतीदेखील मंत्रिमहोदांकडे यावेळी नोंदवली.
महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी अगोदरच  नोंदवण्यात आलेली आहे, असे सांगून केंद्राने यात लक्ष घालावे अशी विनंती केली. सर्वच ठिकाणी आता ई मोबिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये  नावारुपाला येते आह. त्यामुळे लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात ई मोबिलिटी सेक्टर झोन विकसित झाले तर ख-या अर्थाने या भागात मध्ये दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होईल. सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळेल उपजीविकेसाठी होणारे स्थलांतर रोखण्यामध्येही यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला यश मिळेल असे सांगून केंद्र आणि राज्य सरकार या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलेल आणि या दुष्काळी भागाला न्याय देण्यासंदर्भामध्ये भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केलेली निवेदने आणि चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या मुद्यांवर त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला, केलेल्या घोषणा आणि तातडीने करावयाच्या बाबी याबाबत त्यांनी संबंधितांना यावेळी सूचनाही केल्या, काही विषयावर मार्गदर्शनही केले, एकूण भेट आणि चर्चा सकारात्मक ठरली, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले
आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR