16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरलातूर मल्टिस्टेटचे कार्य इतर संस्थांना मार्गदर्शक ठरणारे

लातूर मल्टिस्टेटचे कार्य इतर संस्थांना मार्गदर्शक ठरणारे

लातूर : प्रतिनिधी
लातूर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह के्रडीट सोसायटी एक प्रगत आणि आधुनिकता स्वीकारुन सर्वसामान्य नागरिकांना सर्व प्रकारच्या आर्थिक सुविधा देणारी तर आहेच. पण ही संस्था महाराष्ट्रातील इतर संस्थांना मार्गदर्शकही ठरणारी आहे, असे गौरोद्गार महाराष्ट्र राज्याचे मल्टिस्टेट फेडरेशरचे अध्यक्ष सुरेश साबळे यांनी काढले.
लातूर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह के्रडीट सोसायटीचा वार्षिक कर्मचारी गुणगौरव ‘ऊर्जा-२०२४’ हा कार्यक्रम खंडाळा(लोणावळा) येथे दि. ४ ऑगस्ट रोजी झाला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन साबळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पिंपरी चिंचडचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष फझल शेख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळूंके, खोपेली नगरपालिकेचे माजी नगरसेवक कमाल पटेल, लोणावळा येथील उद्योजक असलम खान, तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, साईबाबा जनता सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन विकास उर्फ सोनू डगवाले यांची उपस्थिती होती. यावेळी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी, वार्षिक ठेव, कर्ज वाटप, कर्ज वसुली व सर्वात जास्त नफा मिळविणारी शाखा यांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.
लातूर मल्टिस्टेटने कर्मचा-यांना बीन व्याजी कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कर्मचा-यांचा काढलेला आरोग्य व अपघाती विमा याबद्दल कौतूक करुन सुरेश साबळे पुढे म्हणाले, लातूर मल्टिस्टेटसारखी प्रगत संस्थेची शाखा पिंपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे येथे सुरु करावी, अशी आग्रही मागणी केली. त्यास सर्व मान्यवरांनी अनुमोदन देत त्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. १२ वर्षांपासून सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करुन कठीण परिश्रमातून संस्था पुढे आणण्यामध्ये संचालक तसेच सर्व कर्मचा-यांचे संस्थापक अध्यक्ष जे. जी. सगरे यांनी कौतूक केले व आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपात चेअरमन इसरार सगरे यांनी संस्थेच्या १२ वर्षांच्या प्रवासातील अडचणी व सुखद क्षणांना उजाळा दिला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन एकनाथ केजकर, संचालक ऋषिकेश बद्दे, प्रकाश बंडगर, प्रभूनाथ कापसे, तुराब बिरादार, विष्णुदास लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल कोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत दाताळ, जनरल मॅनेजर भगवान सांगवे, व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन जाधव, संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी उपसिथत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR