18.2 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeलातूरलातूर शहरातील मंडईत ५१० किंव्टल भाजीपाल्याची आवक 

लातूर शहरातील मंडईत ५१० किंव्टल भाजीपाल्याची आवक 

लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठडाभराच्या तूलनेत आज पुन्हा भाजीपाल्याची आवक कमालीची घट झाल्याची दिसून आली. बाजार समितीत शनिवारच्या सौद्यासाठी अवघ्या ५१० टन भाजीपाल्याची आवक झाली. ही आवक पाहता स्थानिक गरज भागविणेही मुश्कील झाले. त्यामुळे भाजी मंडईतील भाजीपाल्याचे भाव तेजीत असल्याचे व्यापा-यांनी सागीतीले.
शहरातील बाजार समितीत ग्रामीण भागासह शेजारल जिह्यातून तसेज शेजारी राज्यातून भाजीपाल्याची मोठया प्रमाणावर आवक होते. गेल्या दोन महिन्यापासून बाजार समितीत भाजीपाल्याची आवकही काहि प्रमाणात कमि-जास्त होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत भाजीचे दर वाढल्याचे पाहून अनेक शेतक-यांनी बाजार समितीत न जाता शहरातील काहीं भागात थाबून थेट ग्राहकांना विक्री करत आहे. त्यामुळे स्थानिक किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची मागणी जास्त असल्याने आलेल्या ८० टक्के मालाचे सौदे होतात. अवघ्या दोन तासांत सर्व माल संपून जातो. बहुतांशी फळभाज्यांचे कॅरेट सरासरी ३०० ते ४०० याच संख्येने येत आहेत
. एवढा मोजका माल स्थानिक बाजारपेठेत पाठवला जात आहे. त्यामुळे भाववाढ झाली असल्याचे आडत व्यापा-यांनी सागीतले. परंतु काही दिवसांपूर्वी काही भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या दरातही घसरण होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून मागणीच्या तुलनेत काही भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात होत नसल्याने अवघ्या काहीच दिवसांत पुन्हा किरकोळ भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारात भेंडी, फरसबी, फ्लॉवर या दैनंदिन भाज्यांना मोठी मागणी असते. परंतु याच भाज्यांची आवक घटल्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडे प्रतिकिलो भेंडी ३० ते ४० रुपये, फ्लॉवर ३० रुपये, कारले ६० रुपये, हिरवी मिरची ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. तर काहि भाज्या अगदी कवडी मोल भावात विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापउला आहे.
शहरातील बाजार समितीत  वागें १६ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, भेंडी २ किंव्टल आवक होवून ३२० रूपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी ४५ किंव्टल आवक होवून ७० रूपयांचा दर मिळाला, फुल गोभी ५७ किंव्टल आवक होवून ७० रूपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण ५१ किंव्टल आवक होवून ७० रूपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे ६६ किंव्टल आवक होवून ८० रूपयांचा दर मिळाला, गवार १ किंव्टल आवक होवून ५५० रूपयांचा दर मिळाला, भोपळा ११ किंव्टल आवक होवून २५० रूपयांचा दर मिळाला,
हिरवी मिरची ३२ किंव्टल आवक होवून ४२० रूपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची २८ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, वरणा २० किंव्टल आवक  होवून २५० रूपयांचा दर मिळाला, दोडका  ८ किंव्टल आवक होवून ४५० रूपयांचा दर मिळाला, पालक १ किंव्टल आवक होवून ७० रूपयांचा दर मिळाला, शेपू १ किंव्टल आवक होवून ८० रूपयांचा दर मिळाला, कोथिंबीर २५ किंव्टल आवक होवून १०० रूपयांचा दर मिळाला, वटाना ३९ किंव्टल आवक होवून ३५० रूपयांचा दर मिळाला, मेथी २० किंव्टल आवक होवून ८० रूपयांचा दर मिळाला, कांदापात ५ किंव्टल आवक होवून ६०० रूपयांचा दर मिळाला, लिंबू १५ किंव्टल आवक होवून २५० रूपयांचा दर मिळाला, काकडी १० किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, कारले १२ किंव्टल आवक होवून २५० रूपयांचा दर मिळाला, बिट ५ किंव्टल आवक होवून २५० रूपयांचा दर मिळाला असून बाजारात ५१० किंव्टलची आवक झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR