परभणी : जिंतूर तालुक्यातील बेल्लोरा येथील कृष्णा भगवान राठोड (वय २७) या युवकास फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५ वर्षे सश्रम कारावास प २५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास व दंडाची रक्कम फिर्यादीस देण्यात यावी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीय दुसरे ए.ए. शेख यांनी दि.२७ मार्च रोजी हा निकाल दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नानलपेठ पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत पिडीत महिलेने नमूद केले होते की, आरोपी राठोड याने नोटस देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले व आपल्या इच्छेविरूध्द जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अनेकवेळा मनात कपट ठेवून व लग्नाचे अमिष दाखवून संमती मिळवत लैंगिक अत्याचार केला अशा मजुराची फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून आरोपी राठोड याच्या विरूध्द भादवि ३७६ (२) (एन) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पी.आर. बाभळे यांनी केला. तपास दरम्यान त्यांनी फिर्यादी व आरोपीचे कपडे जप्त केले, साक्षीदारांचे जबाब नोंदविले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. नितीन खळीकर यांनी एकुण ६ साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर पिडीतेचा जबाबावरून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे सिध्द झाले. मा.जिल्हा व सत्र न्यायाधीख दुसरे ए.ए. शेख यांनी आरोपी राठोड रा. बेल्लोरा ता. जिंतूर यास कलम ३७६ सह ५११ भादिवी नुसार ५ वर्षे सश्रम कारावास व २५००० रूपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास व दंडाची रक्कम फिर्यादीस देण्यात यावी अशी शिक्षा बुधवारी सुनावली आहे.
सदर खटल्यात मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील नितीन खळीकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजु मांडली. पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पेरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष सानप, पोउपनि. सुरेश चव्हाण, पोह. दत्तराव खुने, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन नानलपेठ पोशि. प्रमोद सुर्यवंशी, मपोह वंदना आदोडे यांनी काम पाहिले.