लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मदतीची आठवण

जळकोट :  ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील शेतक-यांसाठी काही वर्षांपूर्वी सोयाबीन पिकावर आलेले संकट आजही विसरणे कठीण आहे. सोयाबीन पिकावर २००३-४  मध्ये लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उभे पीक अक्षरश: फस्त झाले होते. त्या काळात शेतक-यांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शासनाने नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत केली होती. त्यामुळे संकटाच्या काळात सरकारने आपली दखल घेतल्याची भावना शेतक-यांमध्ये निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे प्रत्येक शेतक-याच्या बांधावर जात पंचनामे न करता सरसकट मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. अगदी आठवडाभरात ही मदत शेतक-यांना मिळाली होती. जळकोट तालुक्यातील अनेक गावांमधील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  शेतक-यांनी पीक वाचविण्यासाठी कीटक नाशकांची फवारणी केली; मात्र अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी अपेक्षित परिणाम झाला नाही.  परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. या संकटाच्या काळात झालेल्या मदतीची आठवण आजही जळकोट तालुक्यातील ज्येष्ठ शेतकरी सांगतात. सध्याच्या  काळातही शेतकरी नैसर्गिक आपत्ती,
पावसातील खंड, अतिवृष्टी, कीड-रोग  आणि उत्पादन खर्चाच्या वाढत्या बोजामुळे अडचणीत येत आहेत. सध्या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. अधिकारी तसेच कर्मचा-यांच्या वतीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  नुकसान झालेले माहिती असताना परत पंचनामे कशासाठी, प्रत्येक शेतक-यांच्या खात्यावर लवकर मदत टाकणे गरजेचे होते.मात्र आता सरकार कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त दिसून येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news