27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलोकनेते विलासराव देशमुख यांना मांजरा साखर कारखाना स्मृती स्थळी अभिवादन 

लोकनेते विलासराव देशमुख यांना मांजरा साखर कारखाना स्मृती स्थळी अभिवादन 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना येथे स्मृतीस्थळी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी अभिवादन केले
यावेळी माजी आमदार अँड. त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन  श्रीपतराव काकडे  रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जागृती शुगर इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हाईस सचिन पाटील, माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, विकास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, इंदिरा सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, संभाजी सुळ, सचिन दाताळ यांच्यासह विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे  संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR