17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Home‘वंदे भारत’ रेल्वेची ३ देशांकडून आग्रही मागणी

‘वंदे भारत’ रेल्वेची ३ देशांकडून आग्रही मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे १२५ हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोप-यात सुरू आहेत. यातच वंदे मेट्रोची पहिली ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली असून, वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी सुरू होत आहे. यातच आता परदेशात वंदे भारतचा डंका वाजत असून, तीन देशांनी वंदे भारत ट्रेनमध्ये रस दाखवला आहे. तसेच भारताकडून वंदे भारत ट्रेन आयात करण्याची तयारी दर्शवली आहे.

भारतातून काही देशांसाठी डबे, ट्रेनसेट निर्यात केले जातात. अनेक देश भारताकडून रेल्वेसंबंधीच्या अनेक गोष्टी आयात करत असतात. श्रीलंका आणि बांग्लादेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.

परदेशात वंदे भारत ट्रेनची मागणी वाढत असून चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यात रस दाखवला आहे. परदेशात वंदे भारत ट्रेनचे आकर्षण असण्यामागे अनेक कारणे असल्याचे म्हटले जात आहे. खर्च हा यातील एक प्रमुख घटक आहे. इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या ट्रेनच्या निर्मितीचा खर्च सुमारे १६० ते १८० कोटी रुपयांच्या घरात जातो. मात्र, वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे १२० ते १३० कोटी रुपये लागतात.

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा वेग हाही घटक महत्त्वाचा आहे. सूत्रांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनला ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी फक्त ५२ सेकंद लागतात. हा आकडा जपानच्या बुलेट ट्रेनपेक्षाही चांगला आहे, ज्याला ० ते १०० किमी प्रतितास वेग येण्यासाठी ५४ सेकंद लागतात. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची संरचना लोकांना खूप आवडते. वंदे भारत ट्रेनमध्ये विमान प्रवासासारखा फील घेता येतो आणि ट्रेनमध्ये येणारा बाहेरचा आवाजही नगण्य असतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR