25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरवलांडी जवळ एस.टी. बस-दुचाकीचा अपघात

वलांडी जवळ एस.टी. बस-दुचाकीचा अपघात

देवणी : प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील वलांडी जवळ उदगीर-निलंगा राज्य मार्गावर उदगीरहून निलंग्याकडे जाणा-या एसटी बसला वलांडीकडे निघालेल्या दुचाकी स्वाराने एसटीस धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. या आपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले आहेत.

वलांडी जवळ उदगीर-निलंगा राज्य मार्गावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उदगीरहून निलंग्याकडे जाणा-या एमएच २० १४९९ या एसटी बसला पेट्रोल पंपावर एमएच २४ एक्स २६६४ या दुचाकी गाडीत पेट्रोल टाकून गौसोद्दीन गफूरसाब बागवान वय ५५, शबाना बेगम गौसौद्दीन बागवान वय ५० रा. साकोळ ता. शिरूर अनंतपाळ हे दोघे पती-पत्नी साकोळहून वलांडी मार्गे देवणीकडे जात होते. समोरून येणारी एसटी बस दिसली नाही. पेट्रोल पंपाच्या दोन्ही बाजूला ऊस वाहतूक करणा-या ट्रॉल्या थांबल्याने समोरून येणा-या एसटीचा अंदाज आला नाही. सदर एसटी बसला धडक बसली. यात या दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी एसटी चालकाने एसटी बस रोडच्या कडेच्या साईडला घेऊनही दुचाकी एसटी बसवर आदळली.

यात गौसोदिन बागवान यांना डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. जखमेवर वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन काळे, पो.हे. का. लामतुरे यांनी सांगितले. सदरील एसटी बस मध्ये उदगीर, देवणी येथून बसलेले ३१ प्रवासी व वलांडी येथून बसलेले दहा ते बारा प्रवासी प्रवास करीत होते. एसटी बस मधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे वाहक भोसले यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR