22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरवांजरवाडा येथे मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

वांजरवाडा येथे मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतिशय नामांकित समजल्या जाणा-या संत गोंिवद स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय पोषण आहाराचा तांदूळ व इतर धान्य शाळेतून टेम्पोमधून चोरून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी  जळकोट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नारायण तिगोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जळकोट पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकासह टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि १५ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वांजरवाडा गावातील दत्ता मसाजी कुंडले व गावातील अन्य लोकांनी शाळेतील मुलांसाठी शालेय पोषण आहार शाळेतून चोरुन घेऊन जात असताना पकडला.  या प्रकरणी जळकोट येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये गटशिक्षणाधिकारी जयंिसंह जगताप यांच्याकडे तक्रार करण्यात आली. श्री संत गोंिवद स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वांजरवाडा शाळेतील मुलांसाठी शालेय पोषण आहार दिला जातो. तक्रारीनंतर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेवरून विस्तार अधिकारी नारायण तिगोटे हे केंद्रप्रमुख नागनाथ कवटकर व बालाजी काटे यांच्यासह वांजरवाडा येथे येऊन श्री संत गोंिवद स्मारक माध्यमिक विद्यालय वांजरवाडा येथे पाहणी केली .
  याप्रसंगी शाळेमध्ये मुख्याध्यापककिंवा अन्य शिक्षक तसेच सेवक दिसून आले नाहीत शाळेतील शासनाने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार पुरवल्यानंतर शाळेत या खोलीत शालेय पोषक आहार ठेवला जातो ती खोली संबंधित अधिका-याांंना उघडी दिसून आली .शाळेच्या समोरच्या बाजूला टेम्पो उभा टाकला होता. यावेळी टेम्पोमध्ये सर्व पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये तांदूळ, हरभरा व मुगडाळ असे पोषण आहारातील धान्य दिसून आले. या टेम्पोमध्ये तांदळाचे ३३ कट्टे ,किंमत वीस हजार रुपये, मूग डाळीचे ३ कट्टेकिंमत दहा हजार रुपये, हरभरा १ कट्टाकिंमत दोन हजार रुपये असा शालेय पोषण आहाराचा माल आढळून आला .   या प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात संत गोंिवद स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंत रामराव कदम व टेम्पो चालक होनराव विरुद्ध तक्रार दिल्यानंतर कलम ३७९, ५११, ३४ अन्वये दि १७ मार्च  रोजी  गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR