23.6 C
Latur
Tuesday, March 11, 2025
Homeलातूरवाहनासह ९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

वाहनासह ९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

लातूर : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने  दि. ८ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला १ लाख २१ हजार ८७० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू  व एक किया कार वाहन असा एकूण ९ लाख २१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे शहानवाज हमीद शेख, वय ३५ वर्ष, रा. बोळे गल्ली, खडक हनुमान, लातूर, इरफान सय्यद, रा. बोळे गल्ली, खडक हनुमान लातूर. (फरार) यांचे विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार मनोज खोसे, रियाज सौदागर, साहेबराव हाके, अर्जुन राजपूत,  राहुल कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR