मुंबई : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे.
दिवसभरात विद्याथ्यांची तीन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तत्काळ एसएमएस पाठवण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असणार असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-या-यांसाठी चारिर्त्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसंच, विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना लगेचच कळवले जाणार आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याबाबत निर्देश देण्यात आले असून यंदापासून सर्व शाळांमध्ये त्याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे. जर विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याबाबतचा मेसेज पालकांना पाठवला जाणार आहे.
सीसीटीव्ही बंधनकारक
विद्यार्थ्यांची हालचाल लक्षात ठेवण्यासाठी शाळेच्या सर्व परिसरात सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे शाळेतील कोणताही अनुचित प्रकार टाळता येणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरा वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने तसेच स्वच्छतागृहांबाहेर लावणे बंधनकारण असणार आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा मागील एक महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नेमणूक करताना पोलिस चारिर्त्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तत्काळ समाप्त करणे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिसर, पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी, असं नमूद करण्यात आले आहे.