विद्यार्थ्यांच्या सहलीला जुन्या बसमुळे ब्रेक

पिंपरी : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या अनेक आगारांत ८ वर्षांखालील नव्या बस नसल्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातून मुंबईला जाणा-या सहली रद्द करण्याची नामुष्की अनेक शाळांवर ओढावली आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष पाहता यावा व त्याची माहिती मिळावी, म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीला मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबरपासून शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसंदर्भात नियमावली जारी केली असून, यात सहलीला फक्त एसटी बसचाच वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारच्या मान्यता असलेल्या शाळांना तब्बल ५० टक्के सवलत या शैक्षणिक सहलीत एसटीकडून दिली जाते. त्यामुळे शाळाही एसटी बसच्या वापरास प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागातील मुलांना नेहमीच मुंबईचे आकर्षण असते. मुंबईत वीर जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग), म्हातारीचा बूट, नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क), गेट वे ऑफ इंडिया, डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयासह अनेक पर्यटन स्थळे आहेत. शांळाही मुलांना मुंबई दर्शन घडावे, म्हणून मुंबईत सहली काढतात. मात्र, मुंबईत सहली काढण्यासाठी शाळांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

मुंबई शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता, उच्च न्यायालयाने आठ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांना मुंबईत येण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही मुंबईत जाणा-या ८ वर्षांवरील जुन्या बसला बंदी घातली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात गेल्या अनेक वर्षांपासून नवीन बस दाखल न झाल्याने दिवसेंदिवस ताफ्यातील बस संख्या कमी होत आहे.

आगारात जुन्या बस
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार बस आहेत. यातील नऊ हजारांहून अधिक बस आठ वर्षांवरील आहेत. ग्रामीण भागातील सर्वच आगारांत जुन्या बस आहेत. त्यामुळे मुंबईच्या सहलीसाठी बसची मागणी करणा-या शाळांना महामंडळाकडून आठ वर्षांखालील बस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. नवीन बस नसल्यामुळे अनेक शाळांवर मुंबईतील सहलीचे नियोजन रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news