28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरविद्यार्थ्यांना टीफीन, अंध दांपत्यांना संसार उपयोगी वस्तूंचे वितरण

विद्यार्थ्यांना टीफीन, अंध दांपत्यांना संसार उपयोगी वस्तूंचे वितरण

लातूर : प्रतिनिधी
समाजातील दिव्यांगाप्रती सहानुभूतीपेक्षा अनुभूतीची भावना जपत मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांतील अंध शालेय विद्यार्थ्यांना टिफिन तर अंध दांपत्यांना संसार उपयोगी वस्तूचे, किराणा सामान वितरण येथील लेबर कॉलनीतील शिवाजी हायस्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम बीऑन व्हीजन फाउंडेशन (बिव्हीएफ) या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने  झाला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, लातूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शीतल मालू, अंबेजोगाई येथील प्रसिद्ध व्यापारी सुहास पाठक, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर घारापूरकर, बीऑन व्हीजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव गोरे, सचिव संदीप चोपडे, कोषाध्यक्ष मीरा चोपडे, सहसचिव प्रशांत गवंडगावे आणि संचालक दशरथ सुरवसे यांची उपस्थिती होती. यावेळी मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या परिसरातील शालेय विद्यार्थी व अंध दांपत्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर व १० वी १२ वी उत्तीर्ण शालेय विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. संजय गवई बोलताना म्हणाले की, आपण दिव्यांग व्यक्त्तींच्या स्वाभिमानी जीवन जगण्याचे अभिनंदन केले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात अडचणी सोडवण्यास आपण सदैव सक्रिय राहू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त्त केली आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले व यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी शीतलताई मालू म्हणाल्या की, आपण बीऑन विजन फाउंडेशन या संस्थेच्या आगामी सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी होऊ, अशी भावना व्यक्त्त केली. संस्थेच्या दिव्यांगांसाठी आयोजित आयोध्या अध्यात्मिक सहल आयोजनास सक्रिय सहकार्य करु,  असे आश्वासित केले. सुधाकर घारापूरकर यांनी व्यावसायिक मार्गदर्शन करुन संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. माधव गोरे यांनी केले. सूत्रसंचालन मीरा चोपडे यांनी केले व प्रशांत गवंडगावे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल निलंगेकर, सुभाष चिने, दशरथ सुरवसे आणि प्रशांत गवंडगावे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR