21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरविद्युत पंपांना दिवसा वीज देण्याचा निर्णय वांझोटाच

विद्युत पंपांना दिवसा वीज देण्याचा निर्णय वांझोटाच

लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारने शेतक-यांना शेतीसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाचा शासनालाच विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. दिवसा विज केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असल्याची व हा निर्णय वांझोटाच ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शेतक-यांना दिवसा वीज सलग मिळत नसल्याने शेतक-यांच्या नशिबी रात्रीचे जागणे सुरूच आहे, शेतक-यांचीद मत आणि समर्थन सर्वांनाच हवे असतात पण त्यांच्या प्रश्नांशी ना सत्ताधा-यांना ना विरोधकांना सोयरसुतक आहे. आजही शेतीसाठी थ्री फेज आठ तास वीज मिळते व १६ तास भारनियमन आहे. यामुळे पाणी असूनही शेतक-यांना वीजे अभावी पिकांना पाणी देता येत नाही. योग्य प्रमाणात योग्य वेळी पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही
 यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि याचा फटका शेतक-यांच्या उत्पनाला बसतो. शासकीय कर्मचा-यांना काही अडचण येऊ नये म्हणून शासन निर्णय घेतो व त्याची जीवन आणि नोकरी कशी सुकर होईल यासाठी प्रयत्न सुरू असतात पण रात्रीचे रात्री शेतक-यांच्या शेती पंपाला वीज दिली जाते. त्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कोणत्या क्षणी शेतात जावे लागते, याची मोठी ओरड झाली यानंतर आम्ही शेतक-यांची कैवारी म्हणून महायुती शासनाने शेतक-यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला होता, याचा राज्यात जोरदार प्रचार करून सहानुभूती निर्माण केली. परंतु जसा पावसाळा संपला आणि शेतक-यांना रब्बी पिकांना पाणी देण्याची गरज पडली तर दिवसा वीज मिळेना, वीज असली तरी ती योग्य दाबाने नाही. दाब होल्टेज कमी असल्याने शेतक-यांचे पाण्याचे पंप ही चालत नाहीत असे चित्र आहे.
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हेच नियोजन महावितरण कंपनीने केले आहे. यामुळे शासनाचा शेतक-यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय वांझोटा ठरला आहे. स्वत:च्या निर्णयाचा शासनाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक डोळ्या समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता असे दिसून येत असल्याने शेतक-यांना दिवसा वीज माणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कड़ी असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR