22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभेसाठी महादेव जानकरांचा स्वबळाचा नारा

विधानसभेसाठी महादेव जानकरांचा स्वबळाचा नारा

पुणे : प्रतिनिधी
महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाहीतर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १०४ जागांवर महादेव जानकर यांच्याकडून तयारी सरू करण्यात आली आहे.

दरम्यान, परभणी लोकसभेत महायुतीचे महादेव जानकर यांचा दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीकडून आता विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकंच नाहीतर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १०४ जागांवर महादेव जानकर यांच्याकडून तयारी सरू करण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रीय समाज पक्षाकडून मतदारसंघाची यादी प्रसिद्ध केली आहे. १०४ विधानसभा मतदार संघात तयारी करा, अशा सूचना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केल्या आहेत. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी महादेव जानकर यांच्या पक्ष आणि महायुती आमने-सामने येणार आहे. या लढतीला मैत्रीपूर्ण लढत असे नाव दिले जाणार की विरोधक म्हणून रासप निवडणूक लढवणार का?, हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR