19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभेसाठी राज ठाकरेंची महायुतीकडे २० जागांची मागणी?

विधानसभेसाठी राज ठाकरेंची महायुतीकडे २० जागांची मागणी?

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. यापूर्वी अनेक बैठका राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये झाल्या. राज ठाकरे दिल्लीत देखील गेले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली होती. दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची १३ जून रोजी महत्त्वाची बैठक आहे. त्याचप्रमाणे कार्यकारिणी निवडणूक देखील याच दिवशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला. नंतर राज ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. विधानसभेला राज ठाकरे मोठ्या प्रमाणात उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.

राज ठाकरे विधानसभेसाठी महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील २० जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे. मुंबईतील मराठमोळे परिसर असलेले दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसे चाचपणी करत आहे.

चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली. काही महत्त्वाच्या नेत्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा देखील करण्यात आली.

विधानसभेसाठी मनसेच्या काही संभाव्य इच्छुक उमेदवारांची यादी देखील जाहीर झाली आहे.
दादर परिसरातून माजी आमदार नितीन सरदेसाई
वर्सोवा परिसरातून मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे
वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे
शिवडी/नाशिक परिसरातून बाळा नांदगावकर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR