शिवसेनेतील उपनेत्याचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. या विस्तारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमदारांना फोन गेले आहेत. ज्यांना फोन गेले आहे, त्यांचे मंत्रिपद निश्चित झाले आहे. परंतु या विस्तारावरुन नाराजीनाट्यही समोर येऊ लागले आहे. शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यानंतरही शब्द पाळला गेला नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्याचवेळी शिवसेनेचे नेते तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी उपनेतेपदाचा हा राजनामा दिला आहे. यामुळे भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत की काय? अशा चर्चेला आता सुरु झाल्या आहेत.

सप्टेंबर महिन्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागपुरात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश मिळाला नाही, अशा बातम्या आल्या होत्या. नागपुरातील ‘रामगिरी’ या मुख्यमंर्त्यांच्या शासकीय निवासस्थानाचे गेट न उघडल्याने त्यांना परत जावे लागले, अशा बातम्या आल्या. त्यावर नरेंद्र भोंडेकर यांनी हे वृत्त फेटाळले होते. ते म्हणाले होते, दहा मिनिटांनी मला शिंदे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी भेटण्यास बोलवले होते.

फडणवीस यांनी आश्वासन पाळले नाही- रामदास आठवले
आरपीआयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले. ते म्हणाले की, जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत माझे बोलणे झाले होते. तेव्हा शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सागितले होते. आता मी दोन दिवसांत पुन्हा दिल्लीत जाणार आहे. तेव्हा त्याच्याशी पुन्हा या विषयावर चर्चा करणार आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news