34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरविभागीय महसूल आयुक्तालयासाठी सर्व राजकीय पक्षांची वज्रमूठ

विभागीय महसूल आयुक्तालयासाठी सर्व राजकीय पक्षांची वज्रमूठ

लातूर : प्रतिनिधी
गेली अनेक वर्षापासून मराठवाडयातील दुसरे स्वतंत्र होणारे महसूल आयुक्त कार्यालय, लातूर येथेच व्हावे म्हणून सातत्याने मागणी केली जात आहे. ही मागणी न्यायाची, हक्काची आणि गुणवत्तेची आहे, एवढेच नाही तर मराठवाड्याच्या संपूर्ण विकासाच्या दृष्टीनेसुध्दा योग्य असुन त्यासाठी लातुरातील सर्व पक्ष संघटना एकत्र आल्या आहेत.
सद्यस्थितीमध्ये लातूर येथे प्रामुख्याने शिक्षण, सहकार, कृषी, पणन, कामगार, उद्योग, धर्मादाय अशा विविध महत्वपूर्ण खात्यांची विभागीय कार्यालय कार्यरत आहेत आणि या कार्यालयाशी लातूरसोबत हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड हे जिल्हे संलग्न आहेत, म्हणून महाराष्ट्र शासनाने लातूर येथे महसूल विभागीय आयुक्तालय स्थापन करावे, या मागणीचा पाठपुरावा व पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन बाबासाहेब परांजपे वाचनालय येथे करण्यात आले होते. समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांनी मागणीसाठी पालकमंत्री यांनी  मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळाची भेट घेण्याची आश्वासन दिले आहे, असे सांगीतले.
बैठकीत माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, अशोक गोविंदपूरकर, अ‍ॅड. प्रदिप मोरे, मोईजभाई शेख, प्रा. सुहास पाचपुते, अ‍ॅड. विजय जाधव, मोहन माने, अ‍ॅड. वसंत उगले, अ‍ॅड. भारत साबदे यांनी विचार मांडले.  या समितीचे निमंत्रक अ‍ॅड. उदय गवारे लातूर, धाराशिव व बीड जिल्हयातील सर्व आमदार व खासदारांना निवेदन देवून सदरील प्रश्न आमदारांनी विधीमंडळात मांडावा तसेच लातूर येथील विविध विभागीय कार्यालयाचे लाभधारक यांनी महसूल आयुक्त कार्यालयाची मागणी लावून धरावी यासाठी प्रयत्न केले जाईल, असे सांगितले. विभागीय आयुक्तालयाच्या सर्वपक्षीय बैठकीस प्रामुख्याने अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, उदय गवारे, मोईज शेख, अ‍ॅड. भारत साबदे, अशोक गोविंदपुरकर, अ‍ॅड.प्रदिप मोरे, अ‍ॅड. विजय जाधव, प्रा. सुहास पाचपुते, प्रा. अनंत लांडगे, शिवाजी नरहरे, डॉ. बी. आर. पाटील, अशोक कांबळे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, निळकंठ पवार, अ‍ॅड. शेखर हवीले, प्रविण साळुंके, अ‍ॅड. शाहरुख पटेल, अ‍ॅड. चिमाजी बाबर, अ‍ॅड. सुनिल गायकवाड, दिलीप आरळीकर, सुर्यकांत वैद्य, भिम दुनगावे, शंकर भोसले, समिर पडवळ आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR