विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

नागपूर : प्रतिनिधी
शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे आणि दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडून आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती दिली. आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रविभवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आव्हाड, आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार महेश सावंत, आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

अंबादास दानवे म्हणाले की, ईव्हीएमच्या आधारावर हे सरकार आलं आहे. सोयाबीन, कापसाला भाव नाही, दुधाचे भाव घसरले असून शेतक-यांची दयनीय अवस्था या सरकारमुळे झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या सभागृहात जोरदर ताकदीने मांडणार असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली. तसेच परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या कोंबिग ऑपरेशन दरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सोमवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला आहे. अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री हे मिरवणुकीत गुंतले आहेत. सरकारचे या सर्व घटनांकडे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावे : विजय वडेट्टीवार
विधान सभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवीन सरकार आल्यावर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर तीन आठवड्याचे अधिवेशन असेल, ही वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या अपेक्षेला या सरकारने हरताळ फासली गेले. सोयाबीनला हमीभाव नाही, धानाला भाव नाही, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी ही अपेक्षा होती. तसेच हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

शेतकरी कर्जमाफीची भूमिका स्पष्ट करा :  नाना पटोले
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली आहे. त्यांचे प्रेत नासण्याचे काम हत्येकरांनी केले. तसेच सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news