27.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्षातील नेते फोडायची भाजपची सवय

विरोधी पक्षातील नेते फोडायची भाजपची सवय

पुणे : प्रतिनिधी
तपास यंत्रणांच्या मदतीने विरोधी पक्षातील नेते फोडायचे ही भाजपची जुनी रणनीती आहे. आता हीच सवय भाजपच्या सहकारी पक्षांची सुद्धा बनली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले. दबाव टाकण्यासाठीच बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने खोटी कारवाई केली आहे. या कारवाईचा जाहीर निषेध असल्याचे रोहित पवार म्हणाले.

कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अचानक तपासणी करण्यात आली. विशेष पथकाने कारखाना कार्यस्थळावर डिस्टिलरी प्रकल्पाच्या कामाची तसेच मान्यतेच्या कागदपत्रांची तपासणी केली.

यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात खळबळ उडाली असून या तपासणीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिद्री साखर कारखान्याच्या प्रतिदिन साठ हजार केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. सुमारे १३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरुवातीपासूनच सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. अशातच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी डिस्टिलरी प्रकल्पावर धाड टाकून तपासणी केली आहे. याच मुद्यावरून रोहित पवारांनी सत्ताधा-यांवर टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR