लातूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत, सोलापूर झोनतर्फे विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूर यांनी दि. २१ ऑक्टोंबर रोजी विभागीय स्तरावरील विविध स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केले. फॅबटेक फार्मसी कॉलेज सांगोला येथे आयोजित इंटर झोनल कुस्ती टूर्नामेंटमध्ये विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत कुस्तीच्या तीव्र लढतीत निर्णायक विजय मिळवून पहीला क्रमांक पटकावला. कोमल ईगवे या विद्यार्थीनीची नॅशनल लेवल कुस्ती स्पर्धेसाठी नीवड झाली.
एम. डी. ए. फार्मसी कॉलेज कोळपा लातुर येथे आयोजित कबड्डी झोनल टूर्नामेंटमध्ये विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या मुलींच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत कबड्डीच्या लढतीत निर्णायक विजय मिळवून दुसरा क्रमांक पटकावला ग्रामीण कॉलेज नांदेड येथे आयोजित चेस झोनल टूर्नामेंटमध्ये विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या संस्कृती शिंदे या विद्यार्थीनीने नेत्रदीपक कामगिरी करत बुद्धीबळाच्या निर्णायक विजय मिळवून दुसरा क्रमांक पटकवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेच्या विविध खेळांमध्ये विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूरने दणदणीत विजय मिळवला.
विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या विजयी संघाचे व पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे सोलापूर झोनचे सचीव प्रा. शिवशरण कोरे यांनी अभीनंदन केले. संघव्यवस्थापक प्रा. राहुल पिंड यांच्या संघाने त्यांच्या समर्थन आणि प्रोत्साहनासाठी प्राचार्य डॉ. बुके एम. व्ही. यांचे आभार मानले तर प्राचार्यांनी संयोजक प्राध्यापकवृंद प्रा. राहुल मंठाळे, प्रा. रवी रंदाळे, प्रा. नीतीन सोनवने, प्रा. सुषमा थोरात यांच्यासह विजयी संघाचे व पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे आभिनंदन केले.