विलासनगर : प्रतिनिधी
येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे गळीत हंगाम २०२४-२५ साठी मील रोलरचे पुजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांच्या हस्ते दि. १२ जुलै रोजी झाले.
यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री सुर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे (पवार), तात्यासाहेब देशमुख, अशोक काळे, नवनाथ काळे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, विलास चामले, शंकर बोळंगे, बाबुराव जाधव, तज्ज्ञ संचालक ज्ञानेश्वर भिसे, महेंद्रनाथ भादेकर, श्रीनिवास देशमुख, कार्यकारी संचालक पंडित देसाई, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख व कामगार आदींची उपस्थिती होती.