24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरविलास साखर गणेशोत्सव मंडळातर्फे रांगोळी स्पर्धा उत्साहात

विलास साखर गणेशोत्सव मंडळातर्फे रांगोळी स्पर्धा उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट-१, वैशालीनगर, निवळी, येथे गणेशोत्सव मंडळातर्फे दि. १४ सप्टेंबर रोजी निवळी येथील निळकंठेश्वर विद्यालय येथील विद्यार्थींनीकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेस खूप चांगला प्रतिसाद मिळाला व ७० विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व महिलांच्या कलेला वाव या हेतुने गणशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार विलास साखर गणेशोत्सव मंडळातर्फे कारखाना साईटवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलींचा एक गट तसेच वरीष्ठ मुली व महीलांचा एक गट असे दोन गटात स्पर्धेचे आयोजन केले होते. शाळकरी मुलीमध्ये निळकंठेश्वर विद्यालयातील मुलींनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. प्रत्येक गटानुसार तीन स्पर्धक प्रथम, द्वितीय व तृतीय असे निवडले प्रथम पुरस्कार २१०० रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह, द्वितीय पुरस्कार १५०० रुपये,  प्रशस्तीपत्र व सन्मान चीन्ह आणि तृतीय पुरस्कार ११०० रुपये,  प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे स्वरुप आहे.
ज्या स्पर्धकांची पुरस्कारास निवड झाली नाही त्यांनासुध्दा मंडळाने प्रोत्साहनपर बक्षिस म्हणुन रोख बक्षिस दिले. गेले, जेणे करुन महीलांना व मुलींना त्यांची गुणवत्ता सिध्द करणेस प्रोत्साहन मिळुन पुढील काळात आणखीन मोठया संख्येने अशा स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुकता वाढेल हाच गणेशोत्सव मंडळाचा उद्देश आहे. असे मंडळाचे कार्याध्यक्ष व कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी यावेळी नमुद केले. स्पर्धेवेळी कारखान्याचे व्हाईस चेअरम रविंद्र काळे, सचिव  एन. एन. काळोखे, जनरल मॅनेजर (टेक्नि) एम. पी. भोरकडे, फायनान्स मॅनेजर ओ. पी. ठाकरे, चिफ केमिस्ट एल.एम.देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी एस. एस. कल्याणकर, डिस्टीलरी मॅनेजर डी. जे. जाधव, चिफ अकौंटट सी. एच. कानवटे, मंडळाचे पदाधिकारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर रांगोळी स्पर्धेत महिला गटात कावेरी शिवाजी शिंदे, संध्या संजय शेंडगे व अरूणा मेकीले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. मुलींच्या गटात नंदीनी काकासाहेब ढोकळे (निळकंटेश्वर विद्यालय निवळी) सृष्टी दिलीप सुरवसे व अंकिता काकासाहेब पाडूळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेत विजेते झालेल्या स्पर्धकांना कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासरावजी देशमुख यांचे  हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांचे मांजरा परिवाराचे आधारवड माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार  धिरज विलासराव देशमुख व कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे तसेच विलास साखर गणेशोत्सव मंडळा प्रमाणे इतर गणेशोत्सव मंडळ व संस्थांनी अशा स्पर्धा आयोजीत करण्याबाबत अवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR