26.9 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रविवाहितेचा खून करत मृतदेहावर बलात्कार

विवाहितेचा खून करत मृतदेहावर बलात्कार

नागपूर येथील धक्कादायक घटना

नागपूर : नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरातील हुडकेश्वर आनंदनगर येथील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेच्या मारेक-याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आरोपीने आधी गळा दाबून महिलेचा खून केला. नंतर बलात्कार करून फरार झाल्याचे खळबळजनक वास्तव उजेडात आले.

रोहित गणेश टेकाम ( वय. २५, रा. पारशिवनी) असे आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिसांनी शनिवारी दुपारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा, न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी रोहित आणि मृत महिला २ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ते दोघेही पारडी परिसरात पेंटिंगचे काम करायचे. ओळख झाल्यामुळे त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक दिले होते.

हुडकेश्वर खुर्दमधील आनंदनगरात ३३ वर्षीय महिला पती व १० वर्षाच्या मुलीसह राहत होती. गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी महिलेचा पती हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी गेला तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळी महिलेला तिच्या ओळखीचा युवक आरोपी रोहितचा कॉल आला. तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले. रोहित तिच्या घरी गेल्यानंतर तिने आरोपी रोहितला दारूची बॉटल आणण्यास सांगितले. दोघांनी सोबत दारू घेतली. रोहितने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्याला विरोध केल्यामुळे आरोपी रोहितने तिला धक्का देऊन खाली पाडले. महिलेच्या कानातून रक्त येत असल्यामुळे तिने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे घाबरून आरोपी रोहित तेथून पळून गेला.

काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी रोहितला आपला मोबाईल महिलेच्या घरात विसरल्याचे समजल्यामुळे तो पुन्हा महिलेच्या घरी गेला. रोहित पुन्हा आल्याचे पाहून महिलेने पुन्हा आरडाओरड सुरू केली. त्यामुळे आरोपी रोहितने ओढणीने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी रोहितच्या मनातील राक्षस जागा झाला. तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

शवविच्छेदनात बलात्कार झाल्याचे उघड
शवविच्छेदन अहवालात महिलेसोबत बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी हुडकेश्वर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला असता आरोपी रोहित महिलेच्या घरी आल्याचे त्यांना समजले. लगेच आरोपीला अटक करून त्याची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. त्यावेळी रोहितने गुन्ह्याची कबुली दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR