सोलापूर : सोलापुरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा ‘रमाईची लेक’ पुरस्काराने करण्यात आला सन्मान त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉल्बीमुक्त जयंतीच्या संकल्पनेतून रमाई आंबेडकर यांची वैचारिक जयंती व्हावी यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाकडून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ११ कार्बगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पाडला पुरस्कार वितरण सोहळा
रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांच्या संकल्पनेतून पार पाडला पुरस्कार सोहळा सामाजिक, राजकीय, आर्थिक, पत्रकारिता, आरोग्य, रेल्वे, पोलीस प्रशासन, वैद्यकीय, कला क्षेत्रात काम करणाऱ्याा महिलांचा यावेळी करण्यात आला सन्मान.
डॉ दिपाली काळे (पोलिस उपायुक्त), डॉ आग्रजा चिटणीस (एम.डी.) डॉ धम्मपाल माशाळकर, संस्थेचे संस्थापक राजाभाऊ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय बनसोडे, शंकर शिंदे, दिपक गायकवाड, विनोद माने, संतोष कदम, आदींनी परिश्रम घेतले.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे
प्रशासकीय सेवा :- संजीवनी व्हट्टे (पोलिस), अमृता देशमुख (निरिक्षक आर.टी.ओ.), अश्विनी शिंगे (अधिक्षक बालगृह)
उत्कृष्ट नगरसेविका :- वंदना गायकवाड (नगरसेविका), क्रीडा जान्हवी चंदनशिवे (योगा)
समाजसेवा :- अंजना गायकवाड. (व्याख्यात्या), आरोग्य सेवा डॉ आग्रजा चिटणीस (एम.डी.)
डॉ क्षितिजा पैके (नेत्रतज्ज्ञ), आशालता मस्के (परिचारिका) उत्कृष्ट पत्रकार अश्विनी तडवळकर (पत्रकार) आदर्श माता :-
जमुना लोंढे, रमाईचा उत्कृष्ट देखावा प्राप्त मंडळ, रमाई युथ फाऊंडेशन, प्रज्ञासुर्य प्रतिष्ठान, माता रमाई सामाजिक संस्था, त्याग मुर्ती प्रतिष्ठान माता रमाई प्रतिष्ठान.