32.5 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeलातूरविशालगड घटनेच्या निषेधार्थ दीड तास निदर्शने 

विशालगड घटनेच्या निषेधार्थ दीड तास निदर्शने 

लातूर : प्रतिनिधी
कोल्हापूर येथील विशालगडावर झालेल्या धार्मिक स्थळ नाससुधसप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटनांच्या निषेधार्थ सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, लातूरच्या वतीने दि. १९ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड तास येथील महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.
विशालगडावर झालेल्या धार्मिक स्थळ नासधुस आणि हिंसेचा निषेध असो, कट्टरपंथीयांवर कठोर कारवाई करावी, जातीवाद मुर्दाबाद…मुर्दाबाद, जातीवाद नही सहेंगे… नही सहेंगे.., मॉब लिचिंग मुर्दाबाद…मुर्दाबाद…, हिंदूस्तान जिंदाबाद… जिंदाबाद…, असा घोषणा यावेळी देण्यात  आल्या. विविध घोषणा आणि मागण्यांचे फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात होते. त्यावर एनडीए  सरकारमध्ये जातीयवादी हिंसाचार वाढतो आहे., मॉब लिंचिंगच्या घटनाही वाढत आहेत,
 विशालगडावरील धार्मिक, प्रार्थनास्थळावर हल्ला करणा-यांना कठोर कारवाई करावी, विरोधी पक्षाने धर्मनिरपेक्षेतेचे सोंग करु नये, अशा घोषणा आणि मागण्या फलकावर लिहीलेल्या होत्या.  महात्मा गांधी चौकात सुमारे दीड तास चालेल्या या निदर्शनात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेत घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती. मोठा पोलीस बंदोबस्तही
होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR