23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeसोलापूरवेळापूर येथे रास्ता रोको आंदोलन

वेळापूर येथे रास्ता रोको आंदोलन

अकलूज / तालुका प्रतिनिधी
वेळापूर येथे महापुरुषांच्या पुतळ्याचे बांधकाम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी रस्ता रोको धरणे आंदोलन करण्यात आले,वेळापूर (ता. माळशिरस) येथील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तसेच स्मारकांचे बांधकाम व सुशोभिकरण करून देण्यात देणार असे संबंधित विभागाच्या वतीने तत्सम अधिकारी यांनी आश्वासन दिले होते.

परंतु वारंवार पाठपुरावा करूनही स्मारकांचा, पुतळ्यांचा विषयी संबंधित विभागाने प्रलंबित ठेवल्याने वेळापुरातील समस्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत पुणे-पंढरपूर सांगोला-इंदापूर महामार्ग रोखून धरत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रांत ऑफिसच्या निवासी नायब तहसीलदार उदया देसाई, नायब तहसीलदार मोमीन, वेळापूर मंडल अधिकारी संदिप चव्हाण यांनी वेळापूर पोलीस स्टेशन एपीआय भाऊसाहेब गोसावी यांच्या उपस्थित व समस्त ग्रामस्थ आंदोलक यांना लेखी पत्र देण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे व मंगळवारी प्रांत कार्यालय येथे पुतळ्यांच्या अनुषंगाने बैठक बोलण्यात आली आहे. या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. याप्रसंगी वेळापूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR