लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्या हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वनभोजनासह वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून विविध गावात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. शिवाय सदर वृक्ष संवर्धनाकरिता शेतक-यांना दत्तक देण्यात आली. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज हा महत्त्वाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. दरवर्षी वसुंधरा प्रतिष्ठान वेळा अमावस्या निमित्ताने हा उपक्रम राबविते.
गुरुवारी लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्या हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त स्वत:च्या शेतात, नातेवाईक तसेच मित्र आप्तेष्ट यांच्या शेतामध्ये जाऊन वनभोजनाचा आस्वाद घेतला जातो. हा सण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्ताने वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने वनभोजन अन वृक्षारोपण ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत लातूर जिल्ह्यातील विविध गावात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लागून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, हा संदेश देण्याकरिता वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे 2015 पासून वनभोजन अन वृक्षारोपण ही मोहीम वेळा अमावस्या दिवशी राबविण्यात येते. गुरुवारीही मोठ्या उत्साहात ही मोहीम राबविण्यात आली.
लातूर तालुक्यातील मळवटी, टाकळी, रेणापूर तालुक्यातील हारवाडी, औसा तालुक्यातील लामजना येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मळवटी गावचे सरपंच गोंिवद गरड, उपसरपंच श्रीकांत बैले, सोसायटीचे माजी संचालक विनायक गरड, रोहिदास सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, नरंिसग सूर्यवंशी, भालचंद्र मस्के, कुसुम मस्के, विलास यादव, श्याम माळकोटेकर, गुणवंत कुलकर्णी, सुमित पंडित, ओमकार ब्याकोडे, विष्णू सलगर, सारिका सलगर, बळीराम सलगर आदींनी सहभाग घेतला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोलप्पा स्वामी, लातूर शहराध्यक्ष उमेश आप्पा ब्याकोडे, वृक्ष लागवड-संवर्धन अभियान प्रमुख राहुल माशाळकर, सदस्य गौसपाशा मणियार, महिला प्रमुख प्रिया मस्के आदींनी पुढाकार घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे.