26.4 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeलातूरवेळ अमावस्या निमित्त बसस्थांकात प्रवाशांची गर्दी

वेळ अमावस्या निमित्त बसस्थांकात प्रवाशांची गर्दी

लातूर : प्रतिनिधी
अवघ्या एक दिवसावर येवून ठेपलेली वेळा अमावस्या उद्या दिÞ ३० डिसेंबर रोजी असली तरी शनिवारपासूनच गावाकडे जाणा-यांनी लातूर शहरातील ग्रामीण बस स्थानक व मध्यवर्थी बसस्थानकावर विद्यार्थांसह नागरीकांनी एकच गर्दी केली असल्याचे दिसून आली.
भारत हा कृषीप्रधान देशात कृषीशी निगडित अनेक सणवार असतात. असाच एक सण म्हणजे वेळा अमावस्या हा सण मार्गशीर्ष महिन्यातील  सातव्या अमावसेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव सज्ज झाला आहे. त्याच बरोबर लातूर शहरासह शेजारील जिल्ह्यात राहणारे व पुणे, मुबंई, छ. संभाजी नगर, नागपुर यासह आदी शहरात राहणारे नागरीक, विद्यार्थी आपापल्या गावाकडे निघालेले दिसून येत आहे. जिल्हाभरात उद्या साजरा केला जाणारा सण हा बळीराजाचा मुख्य सण असतो. वेळ अमावस्या हा सण महाराष्टात प्रामुख्याने लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात मोठया उत्साहात साजरी केला जातो. त्यामुळे बाहेर जिल्ह्यात राहणारे नागरीकांसह विद्यार्थी गावाकडे निघाले असल्याचे शनिवारी दिसून आले. त्यामुळे शहरातील बस स्थानकात वेळ अमावस्याला निगालेल्या नागरीकांसह विद्यार्थ्यांनी  एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR