न्यू चंदीगड : न्यू चंदीगडमधील मुल्लानपूरच्या मैदानावर कर्णधार शाई होपच्या विक्रमी शतकाच्या जोरावर पाहुण्या वेस्ट इंडिच्या संघाने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपचे संकट टाळत शानदार विजय मिळविला. मात्र, याआधीचे २ सामने जिंकल्याने भारताचा मालिका विजय झाला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना के. एल. राहुलच्या शतकासह रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजसमोर ३५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने दमदार प्रदर्शन करीत शानदार विजय मिळविला. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप सलामीला आला आणि त्याने १६२ धावांची खेळी केली आणि वेस्ट इंडिजला पाच विकेटस् राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या आधीचे २ सामने जिंकल्याने मालिक आधीच खिशात घातली होती. मात्र, वेस्ट इंडिजला क्लिनस्वीप करता आले नाही.
















