मुंबई : आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर प्रथमच ट्वीट करून याविषयीची माहिती दिली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन
अत्यंत व्यथित झाल्याचे मुंडेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच मी वैद्यकीय कारणास्तव माझा राजीनामा दिला असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिलेच ट्वीट केले आहे. आपल्या राजीनाम्यावर बोलताना मुंडे यांनी आपण वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.