28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयव्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा

व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केल्यानंतर नवीन व्यापार युद्ध सुरू झाले आहे. टॅरिफ लादण्याच्या पहिल्या कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात अमेरिकेच्या दौ-यावर जाणार असून, यावेळी व्यापारी संबंधांवर वाटाघाटी होण्याची शक्यता आहे.

चिनी वस्तूंवर सध्या लावण्यात आलेल्या १० टक्के टॅरिफमुळे अधिक भारतीय वस्तूंना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी मिळेल. अमेरिकेच्या टॅरिफपासून वाचण्यासाठी भारताने अमेरिकन निर्यातीला फायदा व्हावा यासाठी कर कमी करण्यास सुरुवात केली आहे. यात १,६०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकली, सिंथेटिक फ्लेवरिंग एसेन्स आदींचा समावेश आहे.

अमेरिकेच्या बाजारपेठेत महागाई वाढवणारे व्यापार युद्ध भारतासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आणि सर्वांत मोठे एक्स्पोर्ट मार्केट आहे. २०२३ मध्ये भारताने अमेरिकेला निर्यात केलेल्या वस्तूंमध्ये औषध उत्पादनांचा वाटा सर्वांत मोठा होता. मौल्यवान धातू व मत्स्य उत्पादन दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत.
चौकट
शेअर मार्केटला दिलासा
गेल्या महिन्यापासून अस्थिर असलेल्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आज दिलासा मिळाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४१९.५ लाख कोटींवरून ४२५ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. यातून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवरील नियोजित टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर बाजार सुमारे २ टक्के वाढीसह बंद झाला. यामुळे वाढत्या व्यापार तणावापासून तात्पुरता दिलासा मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे जागतिक बाजारपेठा अस्थिर आहेत. अशात आता बाजारातील तज्ञांचे लक्ष आरबीआयच्या ७ फेब्रुवारीच्या धोरणात्मक निर्णयावर लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR