22.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeसोलापूरव्यापाऱ्याला मागितली आठ कोटींची खंडणी , पाच जणांवर गुन्हा

व्यापाऱ्याला मागितली आठ कोटींची खंडणी , पाच जणांवर गुन्हा

बार्शी : बार्शी येथील व्यापारी पवन श्रीश्रीमाळ यांना घरात जाऊन ८ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल दाखल झाला आहे. त्यातील तिघांना अटक केली आहे.

याबाबत व्यापारी पवन संजय श्रीश्रीमाळ (रा. बालाजी कॉलनी, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी आकाश कानू बरडे
(वय १९, रा. परांडा रोड, बार्शी), अजिंक्य टोणपे (रा. भोसे चाकण, पुणे), दक्ष पांडे (रा. मोरे वस्ती, साने चौक, पुणे) यांच्यासह पाच जणांविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी पोसई उमाकांत कुंजीर तपास करताना आकाश बरडे या आरोपीला अटक करून त्याला बार्शी न्यायालयात न्यायाधीश राऊत यांच्यासमोर उभे केले. त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे तर यातील अजिंक्य टोनपे व दक्ष पांडे हे दोघे पळून गेले आहेत. अन्य दोघे विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यांना सोलापूर बालन्यायालयात हजर करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR